राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 2 ऑक्टोंबरला असणाऱ्या जयंतीच्या 154 व्या पार्श्वभूमीवर आज,

रविवारी (1 ऑक्टोबर) देशभर स्वच्छता मोहिम राबवली जात आहे.

देशभरात स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत श्रमदान केलं जात आहे.

या स्वच्छता अभियानाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुस्तीपटू अंकित बैयनपुरियासोबत श्रमदान केलं.

पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण केली आहे.

पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे

यामध्ये पंतप्रधान मोदी आणि कुस्तीपटूअंकित बैयनपुरिया स्वच्छ आणि स्वस्थ भारताचा संदेश देत आहेत.

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी

आज स्वच्छता मोहिमेला हातभार लावून देशवासियांना स्वच्छतेचा संदेश दिला आहे.