देशात कोरोनारुग्णांच्या वाढत्या प्रकरणांमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळतंय सलग तिसऱ्या दिवशी देशात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे मात्र, देशात कोरोनारुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचं समोर आलं आहे देशात गेल्या 24 तासांत 2 लाख 09 हजार 918 जणांना कोरोनाची लागण झाली असून 959 रुग्णांचा मृत्यू झाला आहे देशातील सक्रिय प्रकरणांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे देशात गेल्या 24 तासांत 959 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे देशभरातील आकडेवारीत रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येत वाढ झाली आहे गेल्या आठवडाभरात कोविडमुळे 5 हजारांहून अधिक लोकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे तर, केरळमध्ये गेल्या 24 तासांत कोविडमुळे सर्वाधिक 374 जणांचा मृत्यू झाला आहे