1983 चा विश्वचषक विजय म्हणजे भारतीय क्रिकेटमधील सुवर्णक्षण म्हटलं तर अतिशयोक्ती नक्कीच होणार नाही. या विजयाने भारतीय क्रिकेटचा चेहरा-मोहराच जणू बदलला. अंडरडॉग समजल्या जाणाऱ्या भारतीय संघाने बलाढ्य वेस्ट इंडिजला नमवून इतिहास रचला. भारताचा 1983 चा विश्वचषक जिंकवून देणारे कर्णधार कपिल देव यांना इतिहासातील एक सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखलं जातं. फिरकीपटू गोलंदाजांसाठी ओळखल्या जाणाऱ्या भारतात मिडीयम पेसर, वेगवान गोलंदाजीची क्रेझ आणण्यात कपिल देव यांचा मोठा हात होता. भारताला पहिला विश्वचषक मिळवून देणाऱ्या कपिल देव यांनी भारतीय क्रिकेटला एक नवी उंची प्रदान करुन दिली होती. 1983 च्या विश्वचषक विजयाचे शिल्पकार, भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांचा आज 63वा वाढदिवस आहे. 1983 च्या विश्वचषक विजयावरील सिनेमा '83' नुकताच प्रदर्शित झाला. ज्यानंतर 1983 च्या त्या ऐतिहासिक विजयाचा आनंद आणि आठवणी भारतभर पसरु लागल्या आहेत. (Photo:@therealkapildev/IG)