संगीत क्षेत्राला कलाटणी देणाऱ्या रेहमान यांच्याबद्दल काही गोष्टी जाणून घेऊया!

भारतातील सुप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांचा आज 55वा वाढदिवस.

1992 सालापासून त्यांनी आजवर अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये मंत्रमुग्ध करून टाकणारे संगीत देऊन जगभरातील चाहत्यांची मने जिंकली आहेत.

पाश्चात्त्य आणि भारतीय संगीताचा सुंदर मिलाफ त्यांच्या गाण्यांमध्ये पाहायला मिळतो.

6 जानेवारी 1966 साली चेन्नईमध्ये रेहमान यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव दिलीप कुमार असे आहे.

रेहमान यांना संगीताचा वारसा वडिलांकडून मिळाला.

23व्या वर्षी इस्लाम धर्माचा स्विकार करत त्यांनी स्वत:चे नाव अल्लाहरखा रेहमान असे नाव ठेवले.