बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री लारा दत्ता ही लग्नानंतर अभिनय क्षेत्रापासून दूर राहिली.

पण काही दिवसांपूर्वीच तिनं कमबॅक केला आहे.



काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या लाराच्या वेब सीरिज आणि चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.

पण ट्रोलर्सनं मात्र लाराला ट्रोल केले.

एका मुलाखतीमध्ये लारानं ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.



पुढे लारा म्हणाली, 'माझ्या वयाने मला लोकांच्या अपेक्षांपासून दूर केलं आहे.

लोकांची अशी अपेक्षा असते की मी ग्लॅमरस दिसले पाहिजे कारण मी मिस यूनिवर्स होते.

काही लोक माझ्या वयापेक्षा माझ्यात असणारं टॅलेंट पाहतात.



बेल बॉटम या चित्रपटातील लाराच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

या चित्रपटात तिनं इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली होती.