पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान गुरुवारी विवाहबद्ध होणार आहेत. ते डॉ. गुरप्रीत कौर यांच्यासोबत विवाह करणार आहेत. हा विवाहसोहळा खाजगी असून मोजकीच लोक उपस्थित राहणार आहेत. या विवाहसोहळ्यालाअरविंद केजरीवाल कुटुंबासह उपस्थित राहणार. भगवंत मान यांचा हा दुसरा विवाह असणार आहे. भगवंत मान यांचा 7 वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. 2015 साली त्यांनी पहिली पत्नी इंद्रप्रीत कौर यांच्यापासून फारकत घेतली. पंजाबसाठी कुटुंबाचा त्याग केला असं ते म्हणाले होते. 48 वर्षीय भगवंत मान हे पंजाबचे 17 वे मुख्यमंत्री आहेत. मान यांच्या पहिल्या पत्नी इंद्रजीत कौर आणि मुलं अमेरिकेत राहतात.