मुंबईमध्ये मागील काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांचा स्फोट मुंबईसह महाराष्ट्रात होत आहे. आज मुंबईत 695 रुग्णांची नोंद झाली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईत बुधवारी 1504 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 10 लाख 91 हजार 607 वर पोहोचली आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. सध्या मुंबईत 5,600 रुग्ण आहेत. मुंबईत आढळलेल्या नव्या 695 रुग्णांमध्ये 655 रुग्णांना अधिक लक्षणं नसल्याने काहीसा दिलासा मुंबईकरांना मिळाला आहे. रुग्ण दुपटीचा दर आणि सक्रिय रुग्णसंख्यादेखील वेगाने वाढत आहे.