गोविंदाने 'इल्जाम' या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. अभिनय आणि नृत्याने गोविंदाने जगभरातील चाहत्यांना वेड लावलं आहे. एका सिनेमासाठी गोविंदा 2 ते 3 कोटींचे मानधन घेतो. एका जाहीरातीसाठी गोविंदा 2 कोटींचे मानधन घेतो. वर्षाला गोविंदा 10 ते 12 कोटींची कमाई करत असतो. गोविंदा जवळजवळ 170 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. गोविंदाच्या संपत्तीत एक आलिशान बंगलादेखील आहे. आलिशान बंगल्यासह गोविंदाकडे आणखी दोन बंगले आहेत. यातील एक जुहूमध्ये तर दुसरा मड आयलॅंडमध्ये आहे. गोविंदाचे कार कलेक्शन खूपच चांगले आहे. गोविंदाकडे असलेल्या लक्झरी गाड्या त्याच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरतात.