हिंदू धर्म मान्यतेनुसार, वटपौर्णिमेच्या सणाला फार महत्त्व आहे.
वटपौर्णिमेच्या शुभ दिनी पूजा आणि व्रत केल्याने मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतात,
तसेच आयुष्यात सुख-समृद्धी, शांती नांदते असं म्हणतात.
पतीच्या सौभाग्यासाठी, दिर्घायुष्यासाठी आणि निरोगी आरोग्यासाठी सुवासिनी महिला या दिवशी वटपौर्णिमेचा उपवास करतात.
कारेगावच्या सरपंच निर्मला शुभम नवले यांचा गेल्या वर्षीचा वटपौर्णिमेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे!
सात जन्मी हाच पती मिळावा, म्हणून निर्मलाताईंनी केली वडाची पूजा केल्याचं पाहायला मिळतं!
या आहेत पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या सरपंच!
वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी निर्मला शुभम नवले सरपंच झाल्या!
सरपंच म्हणून त्यांची बिनविरोध निवड झाली होती
निर्मला नवले या IT अभियंता असून त्यांच्या फॉलोअर्सची संख्या लाखात आहे
निर्मला नवले यांना इंस्टाग्राम वरती 433k फॉलोअर्स आहेत
सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो