पुणे लोकसभा मतदार संघातून पहिल्यांदाच निवडून आलेले खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. त्यांना सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री मंत्रालय देण्यात आलं आज त्यांनी मंत्रालयात पदभार स्वीकारला पुण्यात दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून मुरलीधर मोहोळ यांनी पुढे कॉलेज आणि कुस्तीसाठी कोल्हापूर गाठले. कोल्हापुरात तालीम केलेले मोहोळ 1993 च्या सुमाराला पुण्याच्या राजकीय आराखड्यात उतरले. पक्ष संघटनेत विविध जबाबदाऱ्या पार पाडत मोहोळ यांनी चार वेळा नगरसेवकपद, स्थायी समितीचे अध्यक्षपद आणि महापौरपद सांभाळले आहे. त्यामुळे कसलेला पैलवान ते खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.