मंदिरात फुलांच्या शेषनागाची आणि डाळिंबांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला
बाप्पांचा पाताळातील अवतार असलेला शेषात्मज गणेश जयंती उत्सव साजरा करण्यात आला.
सोमवारी पहाटे 3 वाजता ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक झाला.
त्यानंतर पहाटे 4 ते 6 या वेळेत गायक राहुल एकबोटे यांनी स्वराभिषेकातून आपली गायनसेवा अर्पण केली.
सकाळी 8 ते दुपारी 12 यावेळेत गणेशयाग, दुपारी 1 ते 3 सहस्त्रावर्तनं पार पडली.
रात्री 9 ते 11 वेळेत गणेशजागर देखील पार पडला.
गाणपत्य संप्रदायात भाद्रपद आणि माघ मासाप्रमाणेच ज्येष्ठ चतुर्थीचाही श्रीशेषात्मज जन्मोत्सव महत्त्वपूर्ण मानलेला आहे.
यानिमित्ताने आज दगडूशेठ गणपती मंदिर सजलं आहे.
मंदिरावर शेषनाग प्रतिकृतीची फुलांची सजावट करण्यात आली आहे.