पुण्यातील बाप्पांच्या विसर्जन मिरवणुका ही एक पर्वणीच असते.

मानाचे बाप्पा वाजत-गाजत पुढे पुढे सरकत असताना,

असंख्य भाविकांची मांदियाळी निरोप देण्यासाठी उपस्थित असते.

या काळात पोलीसही चोख बंदोबस्त ठेवतात...

यंदा मात्र गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यावरून

पुण्यातील महत्वाच्या गणेश मंडळांमध्ये मतभेद दिसून येतायत.

त्यामुळं पुण्यातील विसर्जन मिरवणूक व्यवस्थित आणि वेळेत पार पाडण्याचं आवाहन

पुणे पोलिसांसमोर असणार आहे.

पुण्यातील गणेशोत्सव जेवढा खास असतो तेवढीच विसर्जन मिरवणूक देखील विशेष असते .

हिंदू धर्मशास्त्रानुसार सूर्यास्ताच्या आधी गणेशाचं विसर्जन होणं अपेक्षित असतं