आज पुण्यात बाप्पाला निरोप दिला जाणार आहे.



त्यासाठी पुण्यातील काही रस्ते बंद कऱण्यात आले आहे.



चंद्रकांत पाटील यांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी त्यांनी थेट मेट्रो आणि त्यानंतर दुचाकीचा प्रवास केला आहे.



मेट्रो स्टेशनपासून मिरवणूक स्थळ गाठण्यासाठी त्यांनी दुचाकीचा प्रवास केला आहे.



यंदा मिरवणुका लवकर पार पडतील, त्याचं योग्य नियोजन करण्यात आलं आहे, असं ते म्हणाले.



राज्यात काही जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे दुष्काळ दूर होऊ दे, असं साकडं त्यांनी बाप्पाला घातलं आहे.



मेट्रो प्रवासा दरम्यान त्यांनी महिलांशी संपर्कदेखील साधला.



वाहतुकीचे नियम पाळून हेल्मेट घालून त्यांनी प्रवास केला आहे.