त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पुण्यातील पाताळेश्वर मंदिर हजारो दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाले. मंदिरात दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने दिव्यांची रोषणाई केली जाते. ही रोषणाई पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी हजेरी लावतात. मंदिराच्या कळसासह संपूर्ण गाभा-यात लावलेल्या पणत्यांनी मंदिराचा परिसर उजळून निघाला होता. तोरण आणि रांगोळ्यांनी मंदिराचा परिसर सजविण्यात आला. जारो पणत्या, समोर उगवलेला पूर्णाकृती चंद्र मोठी रांगोळी मंद वाऱ्याची झुळूक आणि हे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी पुणेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंदिराच्या कळसासह संपूर्ण गाभा-यात लावलेल्या पणत्यांनी मंदिराचा परिसर उजळून निघाला होता. या वर्षी आकर्षक फुलांची रांगोळी काढण्यात आली. पुण्यातील पाताळेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिव्यांची रोषणाई