पुणेकर गुलाबी थंडीचा अनुभव घेताना दिसत आहे. दिवसभर पुण्यात ऊन सावल्याचा खेळ सुरु असल्याचं दिसत आहे. पुणे आणि आसपासच्या चार भागात 9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हे या हंगामातील आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान आहे. येत्या काही दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आकाश निरभ्र आणि उत्तरेकडील वाऱ्यांमुळे तापमानात घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्याच्या उत्तर भागातही तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसची घट होईल, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे. अशी माहिती पुणे हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी दिली.