पनवेल-कर्जत दुहेरी मार्ग उपनगरी रेल्वे कॉरिडोरच्या कामासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर उद्या 18 जानेवारी सहा तास वाहतूक बंद राहणार आहे.

यामुळे या कालावधीत एक्स्प्रेसवर होणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर मुंबई मार्गिकेवर पनवेल-कर्जत दुहेरी मार्ग उपनगरी रेल्वे कॉरिडोरचे काम करण्यात येणार आहे.

चिखले ब्रिज याठिकाणी उद्या 18 जानेवारीला सकाळी 11 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत काम करण्यात येणार आहे.

रेल्वे कॉरिडोरच्या कामामुळे मुंबई मार्गिकेवर सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात येणार आहे.

त्यामुळे पुण्याकडून मुंबई बाजूकडे येणारी हलकी वाहने मुंबई मार्गिका किमी 55.00 वर वळून मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरून मार्गस्थ करता येतील.

वाहतूक बंद केलेल्या तासांमध्ये एक्स्प्रेसवेवर मुंबई मार्गिकेवर हलक्या आणि अवजड वाहनांसह सर्व प्रकारच्या वाहनांना प्रतिबंधित केले जाईल.

सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार आहे

प्रवाशांनी त्यांच्या प्रवासाचे त्यानुसार नियोजन करावे आणि गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्ग वापरावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

Thanks for Reading. UP NEXT

पुण्यात हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश!

View next story