ड्रीम इलेव्हन (Dream 11) याऑनलाईन फँटसी गेममुळे पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील उपनिरीक्षकाचे नशीब उजळलं.

या क्रिकेटप्रेमी उपनिरीक्षकाला तब्बल दीड कोटी रुपयांची रक्कम बक्षीस म्हणून मिळाली असल्याचे वृत्त समोर आले होते.

आता मात्र, या करोडपती पोलीस उपनिरीक्षकाची चौकशी होणार आहे.

पोलीस उपायुक्तांकडून या दीड कोटी बक्षीस विजेत्या पोलीस उपनिरीक्षकाची चौकशी करण्यात येणार आहे.

ऑनलाईन गेमिंगमध्ये तरुणाई भरकटत चालली आहे, अशात अनेकदा फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर आलेत.

पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडेंची आता पोलीस उपायुक्तांकडून चौकशी होणार आहे.

प्रशासकीय तसेच कायदेशीर बाबी तपासून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल

असं पिंपरी चिंचवड पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.