पुण्यातील हवेची गुणवत्ता मागील काही दिवसांपासून खराब झाली होती.



मात्र काल काही परिसरात पडलेल्या पावसामुळे हवेच्या गुणवत्तेत थोडी सुधारणा झाली आहे.



पुण्यातील कात्रज, खडकवासला, कोथरूड आणि सिंहगड रोड परिसरात काही प्रमाणात पाऊस पडला.



मुंबईपेक्षा पुण्याच्या हवेची पातळी खराब असल्याचं आकडेवारीवरुन समोर आलं होतं.



केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, काल (10 नोव्हेंबर) पुण्यातील हवेची गुणवत्ता lndex (AQI) संध्याकाळी 6 वाजता 110 नोंदवण्यात आली,



तर रात्री 8 वाजेपर्यंत PM 10 आणि PM 2.5 पातळी अनुक्रमे 104 आणि 66 नोंदवली गेली.



याच कालावधीत मंगळवारी (9 नोव्हेंबरला) AQI 146 च्या आसपास होता.



बदलत्या हवामानामुळे वायू प्रदूषण कमी होण्यास हातभार लागल्याचे तज्ज्ञ आणि हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.



कोकण आणि लगतच्या भागात अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.



पुण्यातही ढगाळ वातावरण असून शहरात 11 नोव्हेंबरपर्यंत अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.