उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला.
त्यानंतर आता अजित पवारांच्या जागी पार्थ पवारांची (Parth Pawar) वर्णी लागण्याची शक्यता आहे.
पार्थ पवार यांनी यापूर्वी निवडणूक लढवली होती मात्र जय पवार राजकारणात सक्रिय नव्हते.
कालच अजित पवारांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा 32 वर्षांनी राजीनामा दिला .
अजित पवारांकडे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि पुण्याचं पालकमंत्री पद आहे.
कामाचा व्याप वाढला आहे त्यामुळे अजित पवारांनी पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे.
अजित पवार हे गेल्या 32 वर्षांपासून पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाची जबाबदारी सांभाळत होते.
राज्याच्या सत्तेत येताच अजित पवारांचे दोन्ही मुलं राजकारणात अॅक्टिव्ह मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे
अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील देशातील नंबर 1 ची बँक म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नावलौकिक मिळवलेला आहे.