लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटीलने (Gautami Patil) आपल्या नृत्याने सर्वांना वेड लावलं आहे. लहान मुले आणि वयोवद्धांनाही गौतमीने वेड लावलं आहे. या कार्यक्रमाला तरुणांनी तुफान गर्दी केली आणि धिंगाणा घातला. आता गौतमीच्या नृत्याची सापालाही भूरळ पडल्याचं समोर आलं आहे. नवी मुंबईतील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात साप शिरला होता. अजित पवार गटाचे नेते सचिव राजकुमार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं नवी मुंबईतील कामोठे मानसरोवर परिसरात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमादरम्यान चक्क साप शिरला आणि गोंधळ व्हायला सुरुवात झाली. दरम्यान एका सर्पमित्राने तो साप पकडला, त्यामुळे अनर्थ टळला. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन होत असतं.