3 हजार वर्षांपूर्वी पहिल्यांदा ज्यू केरळच्या मलबार किनाऱ्यावर दाखल झाले, हा त्यांचा भारत प्रवेश. ज्यू राजा सुलेमान याला भारतासोबत व्यापार करण्यास स्वायरस होता. कालांतराने काही ज्यू धर्मीय भारतात स्थायिक झाले. 1940 च्या सुमारास भारतात ज्यू धर्मीयांची लोकसंख्या 50 हजार होती. त्यावेळी भारतात स्वातंत्र्यांचा लढा सुरू होता. जवळपास 2200 वर्षांपूर्वी जुडियामधून ज्यू धर्मीय शरणार्थी भारतात आल्याचे म्हटले जाते. जुडियामध्ये त्यांना रोमन शासकाकडून त्रास दिला जात असे. त्यानंतर तेथून आलेले शरणार्थी महाराष्ट्रात स्थायिक झाले. महाराष्ट्रात मुंबईसह जवळपास 3000 ज्यू धर्मीय राहतात.