पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.



सजवलेल्या रथात कार्यकर्त्यांनी बाप्पाची मूर्ती ठेवली.



या विसर्जन मिरवणुकीच्या रथात मुख्य मूर्ती आणि उत्सव मूर्ती असतात.



त्यातील मुख्य मूर्ती मंदिरात परत जाते, तर उत्सव मूर्तीचं विसर्जन होतं.



वाजत गाजत दगडूशेठ बाप्पाची ही मिरवणूक निघाली आहे.



पुण्यात पाऊस देखील सुरू आहे.



बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्तांचा जनसागर लोटला आहे.



पावसात भिजत भाविक भक्तीत तल्लीन झाले आहे.



पुण्याच्या रस्त्यांवर भाविकांची रीघ दिसत आहे.



दगडूशेठ गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व सहभागी झाले आहेत.



पोलिसांच्या सुरक्षेसह मिरवणूक निघाली आहे.