पुण्यातल्या चांदणी चौकातला पूल काल रात्री जमीनदोस्त झाला. पुणेकर आणि मुंबई-बंगळुरू मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुण्यातल्या चांदणी चौकातला पूल पाडून जवळपास 10 तास उलटल्यानंतर आता वाहतूक सुरु करण्यात आली आहे. अजूनही तिथले ढिगारे हटवण्याचं काम सुरूच आहे. मुंबईकडून साताऱ्याच्या दिशेनं अवजड वाहनं चांदणी चौकापर्यंत आणून थांबवली होती. आधी या वाहनांना एका बाजूने वाट मोकळी करुन देण्यात आली आहे. तर अन्य वाहनांना तूर्त पर्यायी मार्गावरून पाठवण्यात आलं होतं. आता दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. आता दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता