पुण्यातील चांदणी चौकाचा पूल मध्यरात्री ठीक 1 वाजून 7 मिनिटांनी पाडण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून हा पूल पाडण्याची तयारी सुरु होती. हा पूल पाडण्यासाठी रात्री 1 वाजता वाहतूक बंद करण्यात आली होती. पुलाच्या स्ट्रक्चरला 1300 छिद्र पाडून त्यात 600 किलो स्फोटक भरण्यात आली होती. रात्री बारा वाजेनंतर हा परिसर निर्मनुष्य करण्यात आला होता. या परिसरात फार रहिवासी इमारती नाहीत. आजूबाजूला असलेले हॉटेल्स रिकामे करण्यात आले होते. सध्या या ठिकाणचा मलबा हटवण्याचं काम प्रगतीपथावर आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा पूल पाडण्याची तयारी सुरु होती. या पुलाचे दगडी आणि सिमेंटचे बांधकाम स्फोटकांमुळे कोसळले आहे. सध्या पोकलेनच्या सहायाने पुल पाडण्याचे काम सुरू असल्याने वाहतूक उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे. स्फोटानंतर 50 टक्के पुल कोसळला दुसरा ब्लास्ट होणार नाही. त्यामुळे रस्ता रिकामा करण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.