श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीन ऋषीपंचमीच्या मुहूर्तावर दरवर्षी महिलांचे सामूदायिक अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन करण्यात येते.



या दिमाखदार सोहळ्याला 35 वर्षांची परंपरा आहे.



कोरोनाचे दोन वर्ष ऑनलाईन पध्दतीने झाले. यंदा प्रत्यक्ष पठण करण्यात आले.



पहाटेपासून महिलांची मंदिर परिसरात लगबग सुरु होती.



पारंपारिक वेशात सुमारे 31 हजार महिलांनी हजेरी लावली होती.



प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात गणपतीची मराठी आणि हिंदी आरती करण्यात आल्या.



शंखनाद करत या दिमाखदार सोहळ्याला सुरुवात करण्यात आली.



पारंपारिक वेशात भल्या पहाटे महिला उत्साहाने सहभागी झाल्या होत्या



गणरायाचा गजर करण्यात आला.



आलेल्या महिलांनी सेल्फीचा घेत हा मंगलमय क्षण टिपला.