'गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या' असं म्हणत पुण्यातील मानाच्या गणपतींना निरोप देण्यात आला आहे. पुण्यातील मानाच्या बाप्पाला आज निरोप देण्यात आला आहे. ढोल ताशाच्या गजरात गणपती बाप्पाची मिरवणुक काढण्यात आली होती. पुण्यात विसर्जन मिरवणूकीचा उत्साह पाहायला मिळाला आहे. ढोल ताशाच्या गजरात गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं. पुण्यात आज विसर्जन मिरवणुकांची धूम पाहायला मिळाली. पुण्यात पारंपारिक पद्धतीने विसर्जन मिरवणूक काढण्यात आली आहे. दोन वर्षानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यंदा गणेशोत्सवात उत्साहाचं वातावरण आहे. आज दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन लाडक्या बाप्पाने भक्तांचा निरोप घेतला आहे. आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं आहे.