सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आज आगमन झाले आहे. गणेशोत्सव पाहण्यासाठी देशभरातील लोक पुण्यात दरवर्षी येत असतात. रस्त्यावरील गर्दीमधून मार्ग काढत आज गणेश भक्त बाप्पाचं दर्शन घेत आहेत अशातच उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रस्त्यावरील गर्दी लक्षात घेऊन वाहनांचा ताफा टाळून एका ट्रॅफिक पोलिसांच्या मोटरसायकलवर मागे बसून प्रवास केला चंद्रकांत पाटील यांनी पुण्याचं ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीचे दर्शन घेतलं. त्यानंतर भाऊ रंगारी गणपतीच्या प्रतिष्ठापणेसाठी ते जाण्यासाठी निघाले. मात्र रस्त्यावरील गर्दी लक्षात घेता त्यांना वाहनांचा ताफा टाळून एका ट्रॅफिक कॉन्स्टेबलच्या मोटरसायकलवर बसून प्रवास केला चंद्रकांत पाटील यांनी रस्त्यावरील गर्दी लक्षात घेऊन वाहनांचा ताफा टाळून एका ट्रॅफिक कॉन्स्टेबलच्या मोटरसायकलवर मागे बसून पुण्यातील गणपतींचं दर्शन घेणं पसंत केलं