भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग काहीसा घटताना दिसत आहे



देशातील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचित घट झाली आहे



गेल्या 24 तासांत देशात 3207 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे



वाढलेल्या रुग्णांमधील सर्वाधिक रुग्ण वाढ देशाची राजधानी दिल्लीमध्ये झाली आहे



दिल्लीमध्ये गेल्या 24 तासांत हजारहून अधिक कोरोनाबाधित आढळले आहेत



दिल्ली राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार राजधानी दिल्लीमध्ये रविवारी दिवसभरात 1422 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले



देशातील नव्या रुग्णांसह सक्रिय रुग्णांची संख्या 20 हजार 403 वर पोहोचली आहे



केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी दिवसभरात 3 हजार 410 रुग्णांनी कोरोना विषाणू संसर्गावर मात केली आहे



गेल्या 24 तासांत देशात 29 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे



देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 5 लाख 24 हजार 93 इतकी झाली आहे