अभिनेत्री प्रियांका चोप्राने नुकतेच सफेद रंगाच्या ड्रेसमध्ये तिचा जबरदस्त लूक दाखवला आहे. तिचे हे फोटो पाहून प्रियांका म्हणून की परी असा तुम्हालाच प्रश्न पडेल. प्रियांका चोप्राचा फॅशन सेन्स सर्वांनाच आवडतो. थ्री पीस आउटफिटमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. प्रियांका चोप्राने तिचे हे लेटेस्ट फोटो इंस्टाग्राम हँडलवर शेअर केले आहेत. ही अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय असते. ती तिचे प्रत्येक अपडेट फॅन्ससोबत शेअर करत असते.