बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने अलिकडेच बीटाऊनमधील दिवाळी पार्टीला हजेरी लावली होती. यावेळी जान्हवीचा स्टनिंग आणि ग्लॅमरस लूक पाहायला मिळाला. या पार्टीचे काही फोटो जान्हवीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी जान्हवीने कधी लेहेंगा चोली, तर कधी साडी अशा वेगवेगळा लूकमध्ये दिसली. बॉलिवूड कलाकारांसोबतचे मजामस्ती करतानाचे फोटो जान्हवीने शेअर केले आहेत. अभिनेत्री जान्हवीचा अंदाज दिवसेंदिवस अधिक हॉट आणि बोल्ड होताना दिसत आहे. जान्हवी कपूरचे हॉट अँड बोल्ड फोटोंनी चाहते नेहमीच घायाळ होतात. अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या वेगवेगळ्या फोटोशूटमुळे जास्त चर्चेत असते. जान्हवीने फारच कमी वेळात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. जान्हवी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.