बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर अनेकदा तिच्या लूकमुळे चर्चेत असते आणि चाहत्यांच्या पसंतीस उतरते. भूमीने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमध्ये भूमी पेडणेकर एखाद्या राजकुमारीप्रमाणे दिसत आहे. या फोटोंमध्ये भूमी पेडणेकर व्हाईट कलरच्या लेहेंगा चोलीमध्ये ग्लॅमरस पोज देताना दिसत आहे. डायमंड ज्वेलरी, मोकळ केस आणि स्मोकी आय लाईट मेकअपसह भूमीचा हा लूक फारच स्टायलिश दिसत आहे. सोशल मीडियावर भूमी पेडणेकरचा कधी पारंपारिक लूक, कधी ग्लॅमरस स्टाईल तर कधी बोल्ड अवतार पाहायला मिळतो. भूमी पेडणेकर बॉलिवूडच्या बिनधास्त अभिनेत्रींपैकी एक आहे. भूमी पेडणेकरने स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत आणि लोकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. स्टार किड किंवा मनोरंजन विश्वाची पार्श्वभूमी नसतानाही भूमीने बॉलिवूड विश्वात वेगळी छाप पाडली आहे. वडिलांचे छत्र हरपल्यानंतर भूमीने काम करण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासून संघर्ष करत तिने आज हा टप्पा गाठला आहे. अभिनेत्री होण्याआधी भूमीने यशराज फिल्म्ससाठी प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा यांची असिस्टंट म्हणून काम केलं होतं.