प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी काल रात्री आई-वडील झाल्याची बातमी शेअर करत सर्वांना आश्चर्यचकित केले.

गेल्या अनेक दिवसांपासून प्रियांका चोप्रा बेबी प्लॅनिंगचा विचार करत असल्याच्या बातम्यादेखील सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत होत्या.

प्रियांका चोप्राच्या याच पोस्टने तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या घरी छोट्या राजकुमारीचे आगमन झाले आहे.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी 2018 साली लग्नगाठ बांधली.

राजस्थानमधील जोधपूर येथील उम्मेद भवन पॅलेसमध्ये दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न केले.

दोघांनीही लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा केला.

अलीकडेच प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पती निक जोनासचे आडनाव काढून टाकले होते,