पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात दौऱ्यादरम्यान शुक्रवारी आपल्या आईची भेट घेतली. गुजरातच्या दौऱ्यावर असलेल्या मोदींनी आईची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. मोदींनी जेव्हा जेव्हा आईची भेट घेतली, तेव्हा तेव्हा त्यांचे फोटो व्हायरल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आईसोबत भोजन केले. मोदींनी आज आईची भेट घेऊन तिचे आशीर्वाद घेतले. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर पंतप्रधान मोदी गुजरात दौऱ्यावर आहेत कोरोनानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या रोड शो ला परवानगी देण्यात आली भाजप राज्य संघटनेकडून जोरदार तयारी करण्यात आली होती पंतप्रधान मोदी यांच्या रोड शो मध्ये तब्बल 4 लाख नागरिक सहभागी झाले होते