बायडेन यांच्या स्वागतपर भाषणानंतर पंतप्रधान मोदी यांनी आभार मानले. त्यांनी म्हटलं की,
मी तीन दशकांपूर्वी जेव्हा आलो होतो, तेव्हा मी व्हाईट हाऊस बाहेरु पाहिले होते...
मी बऱ्याचदा अमेरिकेत आलो आहे. पण पहिल्यांदाच एवढ्या भारतीयांसाठी व्हाईट हाऊसचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची व्हाईट हाऊसमध्ये (White House) भेट घेतली.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हाईट हाऊसवर उत्साहात स्वागत करण्यात आले.
पंतप्रधान मोदी यांनी या संयुक्त पत्रकार परिषेदमध्ये भारतातील अल्पसंख्यांकांच्या मुद्द्यावर देखील भाष्य केलं.
त्यांनी म्हटलं की, 'भारत आणि अमेरिकेच्या रक्तामध्ये लोकशाही आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यामध्ये आज द्विपक्षीय बैठक पार पडली.
या बैठकीमध्ये त्यांनी यु्क्रेन आणि रशियामधील युद्धासंदर्भात चर्चा केली.
तसेच भारत आणि अमेरिकेची भागीदारी ही जगातील सर्वात परिणामकारक भागीदारी असणार आहे.