संयुक्त राष्ट्र मुख्यालयाची (UN) गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे.
योग दिनानिमित्तानेआयोजित करण्यात आलेल्या योग सत्रात सर्वाधिक देशांच्या नागरिकांनी हजेरी लावली.
यासाठी या विक्रमाची नोंद करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत.
आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित
संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात योगासने प्रात्याक्षिकांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला जगभरातील विविध देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
योग दिनाच्या कार्यक्रमात विविध देशांचे नागरिकत्व असलेली लोक पहिल्यांदाच इतक्या प्रमाणात सहभागी झाले होते.
हा देखील एक विक्रम आहे. त्याची दखल गिनिज बुक ऑफ रेकॉर्डसने घेतली.
योग दिनाचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी छोटेखानी भाषण केले.