अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.



नुकतेच प्राजक्तानं तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत.



प्राजक्तानं निळ्या रंगाचा ड्रेस, हिरव्या आणि निळ्या रंगाची ओढणी आणि स्टोनची ज्वेलरी अशा लूकमधील फोटो प्राजक्तानं शेअर केले आहेत.



प्राजक्ताच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे.



प्राजक्ताच्या या लूकवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.



'ये आँखें देख कर हम सारी दुनिया भूल जाते हैं इन्हें पाने की धुन में हर तमन्ना भूल जाते हैं..' अशी कमेंट एका नेटकऱ्यानं प्राजक्ताच्या फोटोवर केली आहे.



जुळून येती रेशिमगाठी या मालिकेमुळे प्राजक्ताला विशेष लोकप्रियता मिळाली.



प्राजक्ता तिच्या नृत्यशैलीनं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते.



प्राजक्ताच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.



प्राजक्ता ही महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करते.