मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता भूषण प्रधान हा त्याच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असतो. भूषण प्रधाननं नुकतेच त्याच्या डॅशिंग लूकमधील फोटो शेअर केले आहेत. व्हाइट आणि रेड जॅकेट, ब्लू डेनिम आणि व्हाईट शूज अशा लूकमधील फोटो भूषणनं शेअर केले आहेत. भूषणच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. Life isn’t a race… find joy in the Journey! असं कॅप्शन भूषणनं या फोटोला दिलं आहे. भूषण वेगवेगळ्या मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतो . भूषणच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते. कुंकू, पिंजरा ,जय भवानी जय शिवाजी या मालिकांमध्ये भूषणनं काम केलं आहे. दोघी, कॉफी आणि बरंच काही, सतरंगी रे, मिस मॅच, टाइमपास, टाइमपास २ या चित्रपटांमधून भूषण प्रेक्षकांच्या भेटीस आला. भूषणच्या सोशल मीडियावरील पोस्टला देखील प्रेक्षकांची पसंती मिळते.