अमिताभ बच्चन हे त्यांच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात.



अमिताभ बच्चन सध्या चर्चेत आहेत.



बिग बींच्या पाळीव कुत्र्याचे निधन झाले आहे.



अमिताभ बच्चन यांनी भावनिक पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे.



अमिताभ यांचा लाडक्या कुत्र्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.



फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं आहे,आमचा एक गोड छोटा मित्र...आमचा छोटा मित्र, हा मोठा झाला आणि आम्हाला सोडून गेला,.



अमिताभ यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.



अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्येदेखील लिहिलं आहे, आमच्या चिमुरड्या मित्राचं असं मध्येच कायमचं निघून जाण्यानं खूप दुःख झालं आहे. जेव्हा तो आमच्या आसपास असायचा तेव्हा चैतन्य असायचं



माणूस आणि त्याचा पाळीव कुत्रा यांच्यात छान ऋणानुबंध निर्माण होतात. त्यामुळे आता पाळीव कुत्राच्या निधाणाने अमिताभ यांच्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली आहे.



अमिताभ यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.