बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर आज त्याचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. 'आशिकी 2' या सिनेमामुळे आदित्यला लोकप्रियता मिळाली. अल्पावधीतच त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावले आहे. आदित्य रॉय कपूरला बालपणी क्रिकेटची आवड होती. तेव्हा अभिनेत्यापेक्षा क्रिकेटर होण्याची त्याची इच्छा होती. आदित्यला क्रिकेटची आवड असली तरी तो शालेय जीवनापासून नाटकात काम करू लागला आणि त्याला अभिनयाची आवड निर्माण झाली. आदित्यने त्याच्या सिनेसृष्टीतील प्रवासात 'गुजारिश', 'फितूर', 'डिअर जिंदगी', 'ये जवानी है दिवानी' आणि 'आशिकी 2' सारख्या अनेक सिनेमांत काम केलं आहे. सिनेमांसह आदित्यने 'साइड हीरो' आणि 'कॅप्टन' सारख्या वेबसीरिजमध्येदेखील काम केलं आहे. आदित्य हा बॉलिवूडचा एक आघाडीचा अभिनेता आहे. त्याने 2009 साली 'लंडन ड्रीम्स' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आदित्यचा 'आशिकी 2' हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. या सिनेमातील त्याच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले. आदित्यचा 'गुमराह' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तो मृणाल ठाकूरसोबत दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे रिलेशनमध्ये असल्याची चर्चा आहे.