बिग बॉस मराठीच्या घराच्या सुरू असलेल्या साप्ताहिक कार्यामध्ये सदस्यांच्या संयमची कसोटी लागली आहे.

घरात आलेले नवे सदस्य आता फक्त सदस्य नसून लिलिपुट नगराचे हुकूमशहा आहेत.

बाकीचे 8 सदस्य जनता.

त्यामुळे हुकूमशहाच्या आदेशाचे पालन करणे प्रजेस बंधनकारक असणार आहे.

हुकूमशहा देत असलेले कार्य सदस्यांना पूर्ण करावे लागत आहे.

त्यामुळे सदस्यांची दमछाक होताना दिसत आहे.

स्नेहा, आदिश आणि तृप्तीताई हे हुकूमशहा सदस्यांना विविध टास्क देत आहेत.

या टास्कअंती घराला मिळणार आहेत कॅप्टन पदाचे दोन उमेदवार.