येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात प्राजक्ताने जेजुरीत उचलली 42 किलोंची खंडा तलवार

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात जेजुरीत 42 किलोंची खंडा तलवार उचलली आहे.

तलवार उचलतानाचा व्हिडीओ आणि फोटो तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

सदानंदाचा येळकोट म्हणत तिने भंडारा उधळतानाचा व्हिडीओदेखील शेअर केला आहे.

प्राजक्ताने 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत राणी येसूबाईंची भूमिका साकारली होती.

तिने साकारलेल्या भूमिकेचे प्रेक्षकांनी कौतुक केले होते. त्यानंतर प्राजक्ताला 'आई माझी काळूबाई' या मालिकेतून काढून टाकण्यात आले होते.