राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रीया सुळे यांना कोरोनाची लागण झाली आहे. ट्विटरवरून त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.



कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचा पादुर्भाव वाढत असल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारकडून खबरदारी घेण्यात येत आहे.



त्याचत कोरोनाच्या रूग्णांमध्येही गेल्या काही दिवसांपासून वाढ होत आहे.



त्यामुळे राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे.



कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी लसीकरण वाढविण्यावर भर देण्यात येत आहे.



दरम्यान, राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाल्याचं नुकतचं निष्पन्न झालं आहे.



त्यानंतर आता सुप्रीया सुळे यांना कोरोनाची लागण झाली आहे.



(Photo:@supriyasule/FB)