रणवीरच्या चाहत्यांना असा प्रश्न पडला असेल की, रणवीरने या चित्रपटासाठी किती मानधन घेतले? जाणून घेऊयात 83 चित्रपटासाठी रणवीरने किती मानधन घेतले... रिपोर्टनुसार, रणवीरने 83 या चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारण्यासाठी 20 कोटी रूपये मानधन घेतलं आहे. असं म्हटलं जात आहे की, रणवीरने मानधनाबरोबरच 83 चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन मध्ये हिस्सा देखील मागितला आहे. पण याबाबत चित्रपट निर्मात्यांनी अजून कोणतीही माहिती दिली नाही. एका मुलाखतीमध्ये रणवीरने सांगितले की, कपिल देव यांची भूमिका साकारणं त्याच्यासाठी अत्यंत चॅलेंजिंग होतं. रणवीरने त्याच्या फिटनेसकडे विशेष लक्ष दिलं. 6 महिने त्याने तयारी केली.