व्हिटॅमिन सी, बी व्हिटॅमिन, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि अँटिऑक्सिडंट्स हे बटाट्याच्या सालीमध्ये आढळणारे काही महत्त्वाचे पोषक घटक आहेत.
बटाट्याच्या साली खाल्ल्याने कोणते आजार बरे होतात ते येथे जाणून घेऊयात.
बटाट्याची साल रोज खाल्ल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो. उच्च रक्तदाब नियंत्रित करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे.
बटाट्याच्या सालीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी असते, त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यात बटाट्याच्या साली महत्त्वाची भूमिका बजावतात.
बटाट्याच्या सालीमध्ये लोह आणि व्हिटॅमिन सी असते जे अॅनिमियाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे.
बटाटे सालीसह खाल्ल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो आणि पचनसंस्था निरोगी राहते.
बटाट्याच्या सालीमध्ये जास्त प्रमाणात फायबर असते ज्यामुळे पचन सुधारते.
बटाट्याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई असते जे शरीराला कॅन्सरशी लढण्यास मदत करते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.