अभिनेत्री पूजा सावंत ही मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे.

‘दगडी चाळ’, ‘निळकंठ मास्तर', ‘क्षणभर विश्रांती’, ‘पोस्टर बॉइज’, ‘विजेता’ अशा अनेक मराठी चित्रपटात तिने वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

अभिनेता विद्युत जामवालसोबत तिने ‘जंगली’ या बॉलिवूड चित्रपटातही काम केलं आहे. या चित्रपटात तिने शंकरा ही भूमिका साकारली होती.

मराठी कलाविश्वाप्रमाणेच बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री पूजा सावंत सोशल मीडियावरही सक्रीय असते.

वर्क फ्रंटवर, पूजा तिच्या आगामी रोमँटिक चित्रपट 'भेटली ती पुन्हा 2' साठी वैभव तत्ववादीसोबत पुन्हा येण्यासाठी सज्ज आहे.

याशिवाय ती 'दगडी चाळ 2' मध्ये अंकुश चौधरी आणि मकरंद देशपांडेसोबत दिसणार आहे.

(Photo : iampoojasawant/IG)

(Photo : iampoojasawant/IG)