काळी द्राक्षे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहेत. त्यामुळे दृष्टी वाढण्यास मदत होते. काळ्या द्राक्षात पोटॅशियम असते, त्यामुळे ते हृदयासाठीही फायदेशीर असतात. मधुमेहींसाठीही काळी द्राक्ष फायदेशीर आहेत. काळी द्राक्षे खाल्ल्याने शरीरात साठलेली अतिरिक्त चरबी सहज जळून जाते. काळी द्राक्षे किडनी निरोगी ठेवण्यास मदत करतात. काळ्या द्राक्षांत व्हिटॅमिन ई आढळते. जे केस आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे. तसेच यामुळे त्वचेत चमक येण्यास मदत होते. तुम्ही अनेकदा काळी आणि हिरवी द्राक्ष खाल्ली असतील. ही दोन्ही द्राक्षे आरोग्यासाठी आणि चवीलाही चांगली आहेत.