बॉलिवूड आणि साऊथ अभिनेत्री पूजा हेगडे सध्या तिच्या आगामी 'किसी का भाई किसी का जान' या चित्रपटात दिसणार आहे.

या चित्रपटात पूजा सुपरस्टार सलमान खानसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

पूजा हेगडेने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती पारंपारित पोषाखात दिसत आहे.

हे फोटो अभिनेत्रीच्या भावाच्या लग्नातील आहेत.
पूजा हेगडेचा भाऊ ऋषभ हेगडेचे 29 जानेवारी 2023 रोजी त्याची गर्लफ्रेंड शिवानी शेट्टीशी लग्न झाले.

भावाच्या लग्नातील एक झलक अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर शेअर केली.

भाऊ ऋषभ हेगडेच्या लग्नात पूजा सुंदर केशरी सिल्क साडीत दिसली.

तिने ही साडी तिच्या दक्षिण भारतीय शैलीत नेली होती.

या साडीवर सोनेरी रंगाचे काम केले आहे.

पूजाने नक्षीदार ब्लाउज आणि पोल्की दागिन्यांसह तिचा लूक पूर्ण केलाय.