'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री वनिता खरात लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. वनिताच्या मेहंदी सोहळ्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'सह मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी वनिताच्या मेहंदी सोहळ्यात हजेरी लावली होती. वनिताने मेहंदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मेहंदी सोहळ्यातील फोटो शेअर करत वनिताने 'मेहंदी' असं कॅप्शन लिहिलं आहे. मेहंदी सोहळ्यातील वनिता आणि सुमितच्या रोमॅंटिक फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मेहंदी सोहळ्यातील वनिताचा ड्रेस खूपच हटके आहे. सोशल मीडियावर वनिताच्या मेहंदी सोहळ्यातील फोटो व्हायरल होत आहेत. येत्या 2 फेब्रुवारीला वनिता खरात बॉयफ्रेंड सुमित लोंढेसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. वनिता सध्या खाजगी आयुष्यामुळे प्रकाशझोतात आली आहे.