अभिनेत्री सनी लिओनीला शूटिंगदरम्यान दुखापत झाली आहे. सनीने एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. सनी लिओनी सध्या 'ओह माय घोस्ट' या दाक्षिणात्य सिनेमाचं शूटिंग करत आहे. सनी लिओनी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. सनीने सोशल मीडियाच्या माध्यमातूनच तिने दुखापतीचा व्हिडीओ शेअर केला आहे. सनी लिओनीच्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झालेली दुखापत गंभीर नाही. सनीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी तिची खिल्ली उडवत आहेत. सनी लिओनीचे इंस्टाग्रामवर 54 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. सनीने 'एडल्ट' या सिनेमाच्या माध्यमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. सनीचा 'द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.