डाळिंब हे अतिशय चविष्ट फळ आहे. त्याच्या सेवनाने शरीराला अनेक फायदे होतात. डाळिंब या फळामध्ये अॅन्टीऑक्सिडंट, फायबर, व्हिटॅमिन्स, खनिज आणि फ्लेवोनोइड यांसारखी शरीराला आवश्यक असणारी पोषक तत्व असतात. डाळिंबामुळे पचन शक्ती सुधारते. शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी डाळिंब खूप उपयुक्त ठरते. डाळिंब खाल्ल्यानं शरीराचा लठ्ठपणा कमी होतो आणि मधुमेहाची समस्या दूर होते. डाळिंबामुळे रक्तदाबाची समस्या दूर होते. डाळिंबामध्ये अॅन्टीइंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.